Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी महावितरणची केबल लांबवणाऱ्या चोरट्यास अटक

महावितरणची केबल लांबवणाऱ्या चोरट्यास अटक

खेड:- तालुक्यातील लोटे येथून महावितरण कंपनीची ३० हजार रुपये किमतीची केबल चोरणाऱ्या चोरट्याच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दत्तात्रेय शिवाजी गोडसे (२५ रा. नरळेवस्ती खिलारवाडी-सांगोला) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या चोरट्याने महावितरणची केबल लंपास करत्न पलायन केले होते. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात २८ मार्च २०२६ रोजी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी तपासाला गती दिली होती, गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत गजाआड केले.

त्याने चोरलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या चोरट्याचा अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.