रत्नागिरी:- तालुक्यातील पुर्णगड येथील सोसायटीत कामाला असलेल्या प्रौढावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रदिप रविकांत कामतेकर (वय ४०, रा. पुर्णगड, जि. रत्नागिरी) असे मधमाशांनी हल्ला केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदिप कामतेकर हे पुर्णगड येथील सोसायटीत दुचाकीवरुन कामाला जात असताना रस्त्यात मधमाशांचा घोळका येऊन त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये प्रदीप जखमी झाला. तात्काळ उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









