रत्नागिरी:- अणसुरे (ता. राजापूर) येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीदारु बाळगणाऱ्या तिघांवर कारवाई केली. या कारवाई पोलिसांनी एकूण ३ हजार ६० रुपयांची ५० लिटर दारु जप्त केली. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निरंजन प्रकाश साखरकर (३४, रा. अणसुरे, पंगेरे ता. राजापूर), एक महिला, संदीप रमाकांत पंगेरकर (वय ४७, अणसुरे, राजापूर) अशी तीन संशयितांची नावे आहे. या घटना मंगळवारी (ता. २७) सायंकाळी साडेचार ते सहाच्या सुमारास अणसुरे पंगेरे येथे एकाच दिवशी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अणसुरे येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाई संशयित हातभट्टीची दारु विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिसांनी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.