मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मद्यपान पान करुन वाहन चालविणा तरुण पोलिसांच्या कचाट्यात सापडला. त्याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्ना पंढरीनाथ पिलणकर (वय ३६, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास शहरातील खारेघाट रोड येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल किर हे पेट्रोलिग करत असताना स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा खारेघाट रोड रस्त्यावर आले असताना त्यांना संशयित प्रसन्ना पिलणकर हा रिक्षा (क्र. एमएच-८ बीसी ०४३६) मद्यपान करुन रिक्षा निष्काळजीपणे रस्त्यावर चालवित असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना मगदूम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.