मद्यधुंद अवस्थेतील तीन जणांविरोधात गुन्हा

मंडणगड:- तालुक्यातील मौजे वाल्मिकनगर ते वेसवी जाणार्‍या रस्त्यालगत मद्यधुंद अवस्थेतील तीन जणांविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 28 मार्च रोजी रात्री 8.30 ते 9.30 वा. कालावधीत करण्यात आली आहे.

चंद्रकांत रामा जगताप (40,रा.मुळ रा.महाड, रायगड सध्या रा.बाणकोट मंडणगड), रोहित बाबुराव गौतम (31,मुळ रा.मुंबई सध्या रा.बाणकोट,मंडणगड), मोहन रामसरन यादव (45,मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.बाणकोट, मंडणगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही शुक्रवारी रात्री आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पिउन बेधुंद अवस्थेत मिळून आले होते. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.