रत्नागिरी:- शहरातील मजगावरोड रस्त्यावर पादचारी महिलेला स्वाराने ठोकर दिली. दुखापत झाल्यानंतर वैद्यकीय मदत न पुरवता पलायन केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास गोडबेले स्टॉप ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील मजगावरोड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रज्ञा वामन नागवेकर (वय ४२, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) या कामावरुन घरी जात असताना मारुती मंदिर येथील स्टेशनरी दुकानात जात होत्या. दुकानासमोरील मजगाव रोड रस्ता ओलांडताना संशयित स्वार दुचाकी (क्र. एमएच-०८ ए.वाय ५०१६) वरिल चालकाने त्यांना ठोकर दिली. या अपघातात. फिर्यादी-प्रज्ञा यांच्या डाव्या बाजूचे डोळ्याचा भुवईला, नाकाला दुखापत झाली. तसेच डावा पायाला ढोपराखाली खरचटले. त्यांना मदत न पुरवता स्वाराने पलायन केले. या प्रकरणी फिर्यादी प्रज्ञा नागवेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









