रत्नागिरी:- किरकोळ कारणातून तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.मच्छिमार्केट परिसरात घडली.
शाद बंदरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात अरबाज इमरान चौगुले (25,रा.बाजारपेठ,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,रविवारी सायंकाळी अरबाज चौगुले हे त्यांचा मामा तसलीम तुस्कच्या यांच्या रत्नागिरी हलाल चिकन सेंटर दुकानासमोर गेले होते.त्यावेळी संशयित शाद हा तिथेच उभा होता.त्याने अरबाजला तेरे बाप को समजा के रख अशी धमकी देत शिवीगाळ करु लागला.
तेव्हा अरबाजने त्याला तु मला शिवीगाळ का करतोस असे विचारले असता त्याचा राग आल्याने शादने हातातील लाकडी दांडक्याने अरबाजच्या डोक्यात मारहाण केली.त्यानंतर डाव्या हातावर आणि दंडावरही दांडक्याने मारहाण करत दुखापत करुन पळून गेला.याप्रकरणी संशयिता विरोधात भादंवि कायदा कलम 324,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









