रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका मच्छिमारावर चाकूने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ ही घटना घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.
फिर्यादी जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५, रा. भाट्ये-मिऱ्या) हे आपल्या मोटारसायकलने (क्र. MH 08/BF/2323) बोटीच्या कामासाठी मिरकरवाडा जेटीकडे जात होते. सकाळी ११ च्या सुमारास मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ आरोपी शशांक सावंत आणि संजू (पूर्ण नाव माहित नाही) यांनी आपली मोटारसायकल आडवी लावून नार्वेकर यांना अडवले. १ मार्च रोजी भाट्ये-मिऱ्या येथील दत्तमंदिर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
आरोपी शशांक आणि संज यांनी चाकू बाहेर काढून नार्वेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी त्या ठिकाणी आरोपी रुपेश कमलाकर सावंत ऊर्फ ‘छोटा भाई’ हा तिथे आला. त्याने आपल्याकडील चाकूने जयेंद्र नार्वेकर यांच्या पाठीवर, कमरेवर, खांद्यावर, हात आणि पोटावर एकामागून एक सपासप वार केले. या हल्ल्यात नार्वेकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी रुपेश कमलाकर सावंत ऊर्फ छोटा भाई, शशांक सावंत, संजू (पूर्ण नाव अज्ञात) (सर्व रा. सडा-मिऱ्या, रत्नागिसं आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे:
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न), १२६(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.









