मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील पोमेंडी खुर्द येथील ग्रामदैवतेच्या मंदिरातील पाच दानपेटयांचे कुलूप तोडून त्यातील रक्कम चोरणाऱ्या संशयित आरोपीच्या रत्नागिरी शहर पोलिसांनी सिंधुदुर्गतून मुसक्या आवळल्या. पोमेंडीसह तालुक्यातील आरे गावातील दानपेटी देखील याच चोरट्याने फोडली होती. 

सतीश मुरलीधर झाजम ( ४३ , रा . तळेबाजार, देवगड, सिंधुदुर्ग ) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. 

दिलीप श्रीकृष्ण पटवर्धन ( ६२ , रा . हनुमानवाडी पोमेंडी खुर्द ) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रसाद घोसाळे व पोलीस नाईक नंदकुमार सावंत यांनी सतीशला सिंधुदुर्गातून अटक केली.