मंडणगड:- किरकोळ कारणातून मंडणगड तालुक्यातील पाटगाव येथे एकाच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार १९ जून रोजी सकाळी ९ .४० वाजताच्या सुमारास घडली . अनंत सीताराम चिले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे . त्याच्याविरोधात राजेश नरसू दिवेकर ( ३४ , रा . पाटगाव मंडणगड , रत्नागिरी ) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानुसार , सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राजेश दिवेकर यांनी त्यांच्या घराकडे येणाऱ्या पाईपलाईनवर माती टाकून ती पाईपलाईन बुजवली होती . त्यानंतर सकाळी ९ .४० वाजताच्या सुमारास संशयित अनंत चिले त्या पाईपलाईनवरील माती काढत असल्याचे राजेश दिवेकर यांनी पाहिले . त्यांनी त्याला याबाबत जाब विचारला असता दोघांच्यात बाचाबाची होऊन अनंतने राजेश दिवेकर यांना शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली . त्यानंतर बाजूलाच पडलेला दगड उचलून दिवेकर यांच्या डोक्यात मारुन त्यांना दुखापत केली . या प्ररकणी अनंत चिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.