Monday, June 22, 2026
spot_img
Home मंडणगड मंडणगड किल्ल्यावर तरुणाची आत्महत्या

मंडणगड किल्ल्यावर तरुणाची आत्महत्या

बोरीच्या झाडाला घेतला गळफास

मंडणगड:- मंडणगड किल्ल्यावर एका २९ वर्षीय तरुणाने बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल रवींद्र पडवळकर (वय २९, रा. पालघर वरची वाडी, मंडणगड) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निखिल पडवळकर हा तरुण १७ जून रोजी घरातून बाहेर पडला होता, त्यानंतर तो घरी परतला नाही.

​दरम्यान, २० जून रोजी दुपारच्या सुमारास मंडणगड किल्ल्यावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, तो मृतदेह निखिल पडवळकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याने किल्ल्यावरील एका बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.म.नं. ११/२०२६) करण्यात आली आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.