मंगळसूत्र चोरट्याच्या हैद्राबादमधून आवळल्या मुसक्या 

शहर पोलिसांची कामगिरी; अनेक गुन्हे येणार उघडकीस 

रत्नागिरी:- सव्वादोन महिन्यांपूर्वी भरदिवसा शहरातील धनजीनाका येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या चोरट्याच्या रत्नागिरी पोलिसांनी हैद्राबादमधून मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पठाण यासिन खान कल्लूखान (42, रा. राईखंड अहमदाबाद, गुजरात ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चोरीची घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवून शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस नाईक नंदू सावंत, योगेश नार्वेकर या टीमने ही कारवाई केली. मुद्देमालाचा तपास सुरु असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव करत आहे.