भावाच्या खून प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी

दापोली:- दापोलीमधील उन्हवरे येथे सख्ख्या भावाच्या डोक्यात फरशीने वार करून खून प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र गणपत तांबे याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै रोजी रात्री ११.४५ वाचण्याच्या दरम्यान उन्हवरे बौद्धवाडी येथे रवींद्र तांबे याने आपला लहान भाऊ विनोद तांबे यांच्या डोक्यात फरशीने वार करून ठार मारले होते. भावकीमध्ये विनोद अपशब्द बोलला व शिवीगाळ केली म्हणून हा प्रकार घडला होता.

याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात संदीप तांबे यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीनुसार रवींद्र तांबे याच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रवींद्र तांबे याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.