भारतात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ जणांना बांग्लादेशला केले रवाना

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १३ बांग्लादेशी नागरिकांची बांग्लादेशात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली ६ महिन्यांची शिक्षा १४ मे रोजी संपल्यानंतर लगेच ही कार्यवाही करण्यात आली.

भारत-बांग्लादेशाच्या बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात त्यांना दिले जाणार आहे. ते या नागरिकांना बांग्लादेशाच्या स्वाधीन करणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकड़े ही जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादीविरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ एक माहिती मिळाली होती. पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. त्या आधारे पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले होते.