भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत सापडली

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी अज्ञात महिला बेशुध्द अवस्थेत मिळून आली. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवार 16 जुलै रोजी दुपारी 1.30 वा.सुमारास निदर्शनास आली.

बुधवारी दुपारी भाट्ये गावचे स्थानिक नागरिक तहा काद्री आणि सरपंच पराग भाटकर यांना भाट्ये समुद्रकिनारी एक अज्ञात महिला अंदाजे वय (55) ही समुद्राच्या पाण्यात बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांनी तातडीने तिला तहा काद्री यांच्या गाडीतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तिला उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून याबाबत शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे. पोलिस तिचे नाव-गाव आणि नातेवाईकांचा शोध घेत आहेत.