भाट्ये येथे मुळे काढण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता

रत्नागिरी:- शहराजवळील भाट्ये येथे मुळे काढण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास भाट्ये किनारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खडपे वठार येथील एक तरुण रविवारी सकाळी मुळे काढण्यासाठी गेलेला होता. त्याच्या बरोबर अजूनही काही लोक होते. मुळे काढत असताना तो पाण्यातच बसला हे तो बसत असताना लोकांनी पाहिले होते. पण समुद्र खवळलेला असून तो पुढे गेलेला असताना खालीच बसला. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.