रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथे फिर्यादीच्या घराचा लाकडी दरवाजा तोडून नुकसान करत त्यांच्या बहिणीचे अपहरण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 31 मे रोजी दुपारी 1.30 ते 2 वा.सुमारास घडली आहे.
सुफियान सलीम शेख (24, रा.भाट्ये मुरकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, बुधवारी दुपारी सुफियानने फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत त्यांच्या घरातील लोकांना त्रास देण्याच्या उददेशाने घराचा लाकडी दरवाजा तोडला. त्यानंतर फिर्यादी यांची आजी सविता दर्डे यांच्या समोर फिर्यादीच्या बहिणीचे जबरदस्तीने अपहरण करुन कोठेतरी घेउन गेला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सुफियान विरोधात भादंवि कायदा कलम 365 ,447, 448, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.









