रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये ब्रिजच्या बाजुला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक देत अपघात केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 14 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वा.घडली आहे.
शंकर यशवंत बुधवळेकर (49, रा.खेडशी नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, या घटनेतील साक्षिदार पार्थ वायकुळ याने आपली अॅक्सेस दुचाकी (एमएच -08- वाय-2535) आणि साक्षिदार तन्वी मराठे हिने आपली दुचाकी (एमएच -08- एडब्ल्यू-5648) या दोन्ही दुचाकी भाट्ये ब्रिजच्या डाव्या बाजुला उभ्या करुन ठेवलेल्या होत्या.रात्री 11.30 वा.संशयित शंकर बुधवळेकर आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर (एमएच -48- एफ-3623) घेउन भाट्ये ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता.त्याचा कारवरील ताबा सूटल्याने त्याने दोन्ही स्कुटरना पाठीमागून धडक देत अपघात केला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.