भाऊ, भावजय यांच्यावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपातून आरोपीची सुटका

रत्नागिरी:- ऑक्टोबर २०१९ रोजी निवळी येथे घातक हत्याराने हल्ला केल्याच्या गंभीर आरोपाखाली शरद बबन पांचाळ यांचे वर फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. घरगुती वादातून आरोपीने सख्ख्या भाऊ व भावजय यांचेवर घातक हत्याराने हल्ला करुन मारहाण केली असा आरोप पोलिसांकडून आरोपीवर ठेवण्यात आला होता. या आरोपातून संशयित आरोपीची सुटका करण्यात आली आहे.

सदर आरोपीस विधी सेवा प्राधिकरण मार्फत चालवण्यात येणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाकडून मोफत वकील देण्यात आले होते. लोक अभिरेक्षक कार्यालय रत्नागिरी चे विधी सहाय्यक ॲड. आयुधा अक्षय देसाई यांनी सदर आरोपीची बाजू कोर्टासमोर परिणामकारकरीत्या मांडली . आरोपीला जाणीवपूर्वक त्रास देणेसाठी खोटी केस केली ही बाब साहाय्यक लोकाभिरक्षक सौ .आयुधा देसाई यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली . याचा विचार करुन मे.मुख्यन्यायदंडाधिकारी, रत्नागिरी श्री. राहुल चौत्रे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण हक्क असून त्यासाठी त्याला मोफत दर्जेदार विधी सेवा मिळण्याचा हक्क असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकाभिरक्षक कार्यालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी मध्ये देखील लोकाभिरक्षक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. सदर कार्यालयामार्फत कोणत्याही आरोपीला कोणताही भेदभाव न करता मोफत विधी सहाय्य दिले जाते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव श्री. निखिल गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यालयाचे कामकाज चालवले जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोक अभिरक्षक कार्यालयाकडून सर्व आरोपींना मोफत विधि सेवा दिली जाते त्यामुळे अनेकवेळा सदर कार्यालयास जरी टीकेचा सामना करावा लागत असला तरी
लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधीज्ञ कायमचं आरोपीच्या वतीने मे .न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करीत आहेत .