रत्नागिरी:- शहरातील भगवतीबंदर येथे अंमली पदार्थ (ब्राऊन हेरॉईन) विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांवर कारवाई केली. या कारवाईत १० हजार २०० रुपयांचा ४.०० ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महम्मद ताहीर इब्राहिम मस्तान (वय ३४ ) व रुखसार ताहीर मस्तान (वय २८, दोघेही रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. २२) दुपारी एक च्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीचे भगवती बंदर येथील डंपीग प्लॅटच्या पुढी ब्रेक वॉटरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मोबाईल टॉवर जवळ निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी महम्मद यांच्याकडे १३.०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अमंली पदार्थ तर रुखसार हिच्याकडे ४.०० ग्रम वजनाच्या खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉईन असा १० हजार २०० रुपयांचा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार राहूल जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.









