बेलबाग येथून 60 हजार 588 किमतीचा पान मसाला जप्त

रत्नागिरी:- शहरातील बेलबाग येथे बेकायदेशिरपणे विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगल्याप्ररकणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तब्बल 60 हजार 588 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार 22 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास करण्यात आली.

रियाज इक्बाल मुन्सी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महिला पोलिस हवालदार वैष्णवी यादव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा बेकायदेशिरपणे महाराष्ट्र शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिसूनचनेव्दारे प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्रीसाठी आपल्या ताब्यात विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून विमल पान मसाल्याची 223 पाकिटे आणि तंबाखूची 258 पाकिटे असा एकूण 60 हजार 558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा व इतर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.