बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा

रत्नागिरी:-तालुक्यातील दांडे-अणसुरे येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचार्‍यास धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 6 मार्च रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली.

चरण सुभाष हरचकर (रा.पूर्णगड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात प्रदिप भगवान मयेकर (59,रा.दांडे अणसुरे, राजापुर) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी चरण हरचकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08- एडी-9688) घेउन देवगड ते जैतापूर असा भरधाव वेगाने जात होता. तो दांडे-अणसुरे येथे आला असता त्याने पादचारी प्रदिप मयेकर यांना ठोकर देउन अपघात केला.याप्रकरणी अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.