रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. याप्रकारणी चालकविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 17 मार्च 2022 रोजी शिरगाव रेशन दुकानाजवळील वळणात घडला होता.
संजय घनश्याम मयेकर (51,रा.काळबादेवी, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.17 मार्च रोजी ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-पी-7784) वरून बसणी ते रत्नागिरी असे येत होते.ते शिरगाव रेशन दुकानाजवळील वळणात आले असता त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या बांधावर आदळून हा अपघाता झाला होता.
[28/05, 7:25 pm] RE-Pranil:









