बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी राजापुरातील तरुणाला अटक

राजापूर:- तालुक्यातील ओणी गुरववाडी येथे बेकायदेशीर ठासणीची बंदूक बाळगणार्‍या तरुणावर राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. नितीन दत्ताराम गुरव (36, ओणी गुरववाडी, राजापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार राजेश भुजबळराव यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गुरव याने आपल्या घराच्या मागील बाजूस खोपटीत लाकडांमध्ये बंदूक लपवून ठेवली होती याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी जावून चौकशी केली असता ठासणीची सिंगल बॅरलची 5 हजार रुपये किंमतीची बंदूक आढळून आली. त्यानुसार संशयित नितीन गुरव याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 (1), 25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.