बेकायदेशिरपणे घरात घुसून नुकसान केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील फणसोप टाकळेवाडी येथे बेकायदेशिरपणे घरात घुसून सामाईक दरवाजाला लावलेले कुलुप, कडीकोयंडा आणि वरील बाजूस असलेली कडी हातोडीने तोडून नुकसान केले. याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदिप काशिनाथ साळवी (रा.फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आले संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात बाळकृष्ण शिवराम साळवी (69 रा.फणसोप टाकळेवाडी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी 8.30 ते 9 वा.कालावधीत प्रदिपने त्यांच्या घरात अनाधिकारने प्रवेश करत सामाईक दरवाजाला लावलेले कुलुप,कडीकोयंडा आणि वरील बाजूस असलेली कडी हातोडीने तोडून नुकसान केले.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल झोरे करत आहेत.