खेड:- वेरळ खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपाच्या बाहेर बिल देण्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाप्रकरणी जयेश प्रकाश जाधव व त्यांचा लहान मुलगा प्रथमेश एकनाथ जाधव अशी या तिघांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते एकमेकांचे नातेवाईक असून खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपा येथे दारू पिण्यासह जेवणासाठी गेले होते. फिर्यादीने बिल दिले असता चौघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तिघांनी फिर्यादीस डोक्यात रॉड घालून गंभीर जखमी केले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.