रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर माघारी गेल्या नंतर भाजप पुन्हा पक्षात घेत नाही. प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत बाळ माने यांना भाजप प्रवेश नाहीच असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना ठणकावून सांगितले. जे सोडून गेले त्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत प्रवेश देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. यामुळे बाळ माने यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले नेते वेटिंगवर आहेत.
विधान परिषदेला सेनेकडून असलेली अधिकृत उमेदवारी मागे घेतल्यावर बाळ मानेंची ठाकरेसेनेतून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळ माने यांच्याबद्दल सकारात्मकता दर्शवून ते पूर्वीचे भाजपचेच सहकारी होते, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांची भाजपमध्ये घरवापसी होईल असे वाटत असताना आज रविंद्र चव्हाण यांनी बाळ मानेंच्या प्रवेशाला नकार दिला आहे.









