बाणकोट:- ४ जुलै रोजी सकाळी ८:०० ते ५ जुलै रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पन्हाळी बुद्रुक येथील जाखमाता मंदिर आणि स्वयंभू शिवमंदिरातून तांबे, पितळ आणि कांस्य या तीन धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या एकूण ०६ घंटा चोरीला गेल्या आहेत.
चोरी झालेल्या घंटांची किंमत २७,०००/- रुपये आहे. अज्ञात चोरट्याने दोन्ही मंदिरांच्या उघड्या दरवाजामधून आत प्रवेश करून फिर्यादी आणि देव्हारे पोलीस पाटील यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी ही चोरी केली. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये १०,०००/- रुपये किमतीची २० किलो वजनाची १ घंटा, ६,०००/- रुपये किमतीची १० किलो वजनाची १ जुनी घंटा, ६,०००/- रुपये किमतीची १२ किलो वजनाची १ पिवळसर रंगाची जुनी घंटा, प्रत्येकी २०००/- रुपये किमतीच्या ०४ किलो वजनाच्या २ जुन्या घंटा आणि १,०००/- रुपये किमतीची ०२ किलो वजनाची १ जुनी घंटा यांचा समावेश आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ नुसार गु.र.नं. ०९/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.