रत्नागिरी:- लावी सेफ हॅण्ड अल्कोहोल बेस हॅण्ड सॅनिटायझरचा नमुना औषध निरीक्षक सोपान वाढे यांनी रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरातील नॅशनल मेडिकल या दुकानातून काढले होते. तपासणीनंतर मानकाप्रमाणे दर्जा न आढळल्याने उत्पादक आणि विक्रेत्यांविरुध्द खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी कोल्हापूरच्या धोंडिबा तुकाराम कान्हुरकर याना २५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
रत्नागिरी येथील औषध निरीक्षक सोपान वाढे यांनी ११ मे २०२१ रोजी लावी सेफ हॅण्डस नावाचे हात निर्जंतुक करण्याचे अल्कोहोल बेस औषध नॅशनल मेडिकल्स दुकानातून खरेदी केले. प्रयोगशाळेत तपासणीकरीता ते पाठवण्यात आले. प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार हे औषध आदर्श मानकांप्रमाणे नाही आणि ते बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणामध्ये मंगळवारपेठ कोल्हापूरच्या कान्हुरकर यानी परवाना नसताना हे औषध वितरीत केल्याचा आले. व अन्य आरोप ठेवण्यात रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात त्यांच्यासह अन्य दोन लोकांविरुध्द खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणात आपल्याला जामीन मिळावा अशी मागणी कान्हुरकर यानी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी दाखल झालेला अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मल्लिकार्जुन आंबळकर यांच्यासमोर अपिल म्हणून जामीन अर्ज दाखल झाला. त्यांनी सरकार पक्षाचीही बाजू ऐकून घेतली आणि आरोपीला २५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.