रत्नागिरी:- मोबाईलवर फेक लिंक पाठवून त्याद्वारे बँक खात्यातील १ लाख रुपये काढून घेतले.ऑनलाईन फसवणूकीची ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत राकेश रत्नाकर नाचणकर (४०,रा.आंबेशेत कर्ला, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,अज्ञाताने नाचणकर यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील बचत खात्यातून 1 लाख रुपये काढून घेतले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.