बनावट नोटा प्रकरणी झोंबडी सरपंचांवर गुन्हा दाखल

गुहागर:- तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळीमधील बैंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ५०० रुपयांच्या ८० बनावट नोटा भरल्याप्रकरणी झोंबडीचे सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्याविरोधात. गुहागर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला. आहे. या घटनेमुळे या नोटा कुठून आल्या, आणखीन किती नोटा बाजारपेठेमध्ये आहेत, या बाबत सध्या चर्चा रंगत आहे.

गुहागर पोलीस ठाण्यामध्ये बैंक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेच्यावतीने मुकुंद श्रीपाद खांडेकर (४९) यांनी बनावट नोटा मिळाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली. ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास शृंगारतळी येथील कॅश डिपॉझिट मशीनमध्ये खातेधारक अतुल अनंत लांजेकर यांनी आपल्या खात्यात ४० हजार रुपये किंमतीच्या ५०० रुपयांच्या ८० बनावट नोटा या नकली नोटा असल्याची जाणीव असतानाही त्यांनी या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून त्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या. त्याचा वापर केल्याने फिर्यादींनी त्यांच्याविरूध्द तक्रार नोंदवली. या प्रकरणी अतुल लांजेकर यांच्याविरोधात भादंवि कलम ४८९(ब), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर आता या नोटा कुठून, कशा आल्या, या बाबतचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.