बंदुकीसह काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना जामीन मंजूर

खेड:- विनापरवाना दोन बॅरल बंदुकीसह १२ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केलेल्या त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

संशयितांच्यावतीने ॲड. अश्विन भोसले सिद्धी खेडेकर यांनी काम पाहिले. बोरज येथील अनिल भिकू गुहागरकर (५३ बोरज-शिवफाटा शेवरवाडी) याच्या ताब्यातील २७ हजार ५०० रुपये किंमतीची बॅरल बंदूक व आठ जिवंत काडतुसे तर याच गावातील राजेश गजानन साळवी याच्याकडेही २६ हजार २०० किमतीची विनापरवाना सिंगल बॅरल बंदूक, चार जिवंत काडतुसे जप्त केली होती.