लांजा:- लांजा रेस्ट हाऊस माऊली नगर येथील मंगेश शांताराम सरदेसाई यांचा बंद बंगल्याचे मागील दार फोडून घरात प्रवेश केला. बुधवारी भर दुपारी २ ते ३ या दरम्यानची घटना घडली आहे. दोन चोरटे बाईक वरून आले. तर नागरिकांना माहिती मिळतात चोरटे बाईक टाकून पसार झाले.
लांजा शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी मागील घरातील नवीन फ्याशंन चोरट्यानी लांबवली. हे पहाताच रोहित धोंडये,सोहम सरदेसाई ,साई जुवेकर युवकांनी चोरट्याच्या पाठलाग केला. या वेळी चोरट्याच्या खांद्याला असलेली बॅग युवकांनी पकडली असता चोरट्यानी बंदुकीचा धाक दाखवताच युवकांनी पाठलाग थांबवला. चोरट्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने शहरात दहशद निर्माण झाली आहे.