Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- बॅंकेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश करुन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी संशयितांविरुद्ध
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद कापडे व आयशाबी इरफान कापडे (रा. शंखेश्वर हेरिटेज, बी विंग, दुसऱ्या मजला, नाचणे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास नाचणे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विश्वास सत्यनारायणराव आंचलकर (वय ३५, रा. आरोग्यमंदिर, रत्नागिरी) यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनद्वारे पंजाब नॅशनल बॅंक शाखा-रत्नागिरी यांनी शंखेश्वर हेरिटेज बी विंग, दुसऱ्या मजल्यावर असलेला फ्लॅट नं १९ एकूण क्षेत्र ५७१ चौ. फुट नाचणे रत्नागिरी या मिळकतीचा ताबा कायदेशिररित्या मिळवलेला असताना संशयितांनी कोर्ट कमिशद्वारे लावले कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केला. या प्रकरणी विश्वास आंचलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.