रत्नागिरी:- पाली येथील एका महिलेचे फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना अश्लील पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ मार्च २०२५ या कालावधीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाली येथील फिर्यादी महिलेचे संशयिताने फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन फिर्यादीचे ओरीजनल फेसबुक फिर्यादीच्या नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणांना पाठवून त्याच्या सोबत अश्लील भाषेत चॅटींग करत, अश्लील पोस्ट केल्या. या प्रकरणी फिर्यादी महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.