रत्नागिरी:- खाउगल्लीत कुल्फी विक्री करणार्या दोन भावांना अज्ञातांनी मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ही घटना मागील आठवड्या घडली होती.
धर्मराज मुनक्का निषाद (34), प्रदिप निषाद (दोन्ही मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.कोकणनगर,रत्नागिरी) अशी मारहाण करण्यात आलेल्या कुल्फी विक्री करणार्या दोघांची नावे आहेत. यातील धर्मराज हा खाउगल्ली येथे कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतो. मागील आठवड्यात त्याची मुलगी आजारी असल्याने तिला परकार हॉस्टिपटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रदिप हा कुल्फि विक्रीचा व्यवसाय करत होता. प्रदिप कुल्फिची गाडी घेउन विक्री करण्यासाठी खाउ गल्ली येथे जात असताना दोन अज्ञातांनी त्याला अडवून आम्हाला फुकट कुल्फि दे असे सांगितले. त्यावर प्रदिपने नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हढ्यात प्रदिपचा भाउ धर्मराजही त्याठिकाणी आला असता दोन्ही संशयितांनी त्यालाही हातांनी तसेच दगडांनी मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान पाटील करत आहेत.