फिनोलेक्स कॉलेज नजीक लॅपटॉप चोरी प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील मिरजोळे येथील फिनोलेक्स कॉलेज शेजारी येथून अनोळखी तरुणाने फिर्यादी यांच्या घरातून लॅपटॉपची चोरी केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २) पहाटे तीन ते सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चिन्मय अजित नाईक (वय २०, रा. फिनोलेक्स कॉलेज शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. मुळ गाळेल. ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग) यांचा जूना २५ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप अनोळखी तरुणाने पळविला. अनोळखी तरुणाच्या अंगात चौकडीचे शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, कॉलेजची सॅक, दाडी वाढलेली, केस कुरळे तसेच दक्षिण भारतात वास्तव्यास वाटणारा याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लॅपटॉप चोरुन नेला. या प्रकरणी चिन्मय नाईक यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.