रत्नागिरी:- दापोली तालुक्यामधील नारगोली येथे फळबागेला आग लागून नुकसान केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रंजना चांदिवडे व अनुसया भडवळकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारगोली येथे अचानक आग लागून सुमारे 670 काजूची झाडे जळून 6 बागायतदारांचे 2 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.45 वाजता घडली होती. या पकरणी दापोली पोलीस स्थानकात खबर देणारे विजय भदीरके (58,रा. नारगोली-टाळसुरे) यांना रंजना चांदिवडे व अनुसया भडवळकर यांनी बागेमध्ये आग लागल्याची माहिती दिली होती. रंजना व अनुसया यांनी ग्रामस्थांच्या मदतीने लागलेली आग आटोक्यात आणली.