चिपळूण:- फर्निचर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराने मालकाचे 14 हजार रूपये लांबवल्याची घटना मार्च महिन्यात पेढे येथील “मुंबई ट्रंक आणि फर्निचर कारखाना” येथे घडली. या प्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील उर्फ अरविंद कुमार असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
अरविंद कुमार हा पेढे-सवतसडा धबधब्यासमोर असलेल्या मुंबई ट्रंक आणि फर्निचर नावाच्या फर्निचर कारखान्यात कामाला होता. त्याने 6 ते 7 मार्च या कालावधीत कारखान्यातील पत्र्याच्या लोखंडी कपाटातून रोख रक्कम 14 हजार रुपये चोरुन नेले. हा प्रकार मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबतची फिर्याद पोलिसात दिल्यानुसार शकील उर्फ अरविंद कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.