फगरवठार येथील घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास 

रत्नागिरी:- शहरातील खालचा फगरवठार येथील घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल तरुणाने लांबवला. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी स.8 ते 24 फेब्रुवारी रोजी स.8 वा. कालावधीत घडली आहे.

 विजय राजाराम वाळवे (34, रा.खालचा फगरवठार, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रज्ञा परशुराम पाष्टे (47,रा.खालचा फगरवठार, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,विजयने त्याच्यावर पाळत ठेऊन त्या घराबाहेर गेल्यानंतर खीडकीला लावलेल्या छत्रीमधील चावी घेऊन घराचे कुलूप उघडले.त्यानंतर घरातील लॉकरमधून सोन्याचे मंगळसूत्र,नेकलेस, अंगठ्या,चेन, कर्णफूल आणि रोख 10 हजार रुपये असा एकूण 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.