Saturday, August 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी प्रौढाची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

प्रौढाची स्वतःला पेटवून घेत आत्महत्या

रत्‍नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजरभाटी येथील प्रौढाने अज्ञात कारणातून राहत्‍या घरी सकाळी 10.40 वा.सुमारास स्वतःला पेटवून घेतले. त्‍याला भाजलेल्या अवस्थेत जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदरम्यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.

नवनाथ दशरथ पाटील (49,रा.नेवरे काजिरभाटी, रत्‍नागिरी) असे स्वतःला पेटवून घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत अमित गुरनाथ पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, गुरुवारी सकाळी ते नेवरे बाजारपेठेत असताना त्‍यांची बहिण अंकिता हिने त्‍यांना फोन करुन काका नवनाथ पाटील हे राहत्‍या घराच्या मागील पडविमध्ये भाजलेल्या अवस्थेत ओरडत असल्याचे सांगितले. त्‍यानंतर अमित पाटील यांनी घरी जाउन शेजारील लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून नवनाथ पाटील यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले त्‍याठिकाणी उपचार सुरु असताना दुपारी 12.15 वा.सुमारास त्‍यांचा मृत्‍यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.