प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेसाठी स्वतंत्र्यादिनी चार उपोषणे

रत्नागिरी:- देशभरात स्वतंत्र्यांचा अमृत महोत्सव जल्लोशात साजरा होत आहे. देशाला स्वतंत्र मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली तरीही छोट्या-मोठ्या समस्यांसाठी सर्व सामान्य नागरिकांना अजूनही स्वतंत्र दिनी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर चौघांनी दिवसभर लाक्षणीक उपोषणे केली. मात्र सायंकाळपर्यंत या उपोषणकर्त्यांंकडे प्रशासने लक्ष दिले नव्हते.

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर होणाऱ्या बेकायदेशीर पर्ससीननेट मासेमारीवर करवाई करण्यासाठी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेचे पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मासेमारीच्या सुधारीत कायद्याची अंमलबजावणी करुन पर्ससीननेट मासेमारी, एलएडी मासेमारीवर बंदी घालून त्यांच्यावर कठोर करवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्या येथील जयश्री गणपत पाटील यांच्यावतीने त्यांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना हातखंबा गावातील 20 फुटी रस्ता सापडत नसल्याबद्दल उपोषण सुरु केले आहे.तारवेवाडी येथील रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नोंद वहीत आढळून आलेली नाही. संबधीत विभागांनी वेळेत दखल न घेतल्याने रस्ता शोधण्यासाठी एका वर्षाचा कालावधी उलटला आहे. तरी संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले.
मयत व्यक्त बाहेेर गावी असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र देत त्याद्वारे तक्रारदारांच्या जागेसह सरकारी जागेवर बांधकाम करुन सीआरझेडचे उल्लंघन करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काळबादेवी येथील शैलेंद्र मयेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील राममा-66 ते तळेकांटे-तुळसणी-देवरुख रा.मा.174 रस्त्याच्या ठेकेदाराने केलेल्या अनधिकृत माती उत्खनन व रस्ता दुरुस्तीसाठीच्या कामाची व्हिजीलियनस्‌‍मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व नगरसेवक अनुराग कोचिरकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह उपोषण सुरु केले आहे.