रत्नागिरी:- पोलीस असल्याची बतावणी करत नाचणे येथील वृद्धाकडील तब्बल एक लाख किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. जे के फाईल येथील एलजी शोरूम समोरील रोडवर हा प्रकार घडला असून या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जयप्रकाश लक्ष्मण माळवदे (वय 73 रा. सह्याद्री नगर नाचणे) असे फिर्यादी वृद्धाचे नाव आहे. माळवदे हे 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.45 वाजता जे के फाईल एलजी शोरूम जवळ मुख्य रस्त्याने चालत असताना दोन अज्ञात इसमानी माळवदे यांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडील तब्बल 1 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.