पॉलिसी सरेंडर करुन देण्याच्या बहाण्याने 2 लाख 97 हजारांची ऑनलाईन फसवणूक

चिपळूण:- पॉलिसी सरेंडर करुन बँक खात्यात पैसे जमा करतो, असे सांगून एकाच्या बँक खात्यामधून 2 लाख 97 हजार 999 रुपये काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना 4 जुलै रोजी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 जुलै रोजी सायंकाळी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी टोल फ्री व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या वेब साईटवरुन एका अज्ञात पुरुषाने (नाव गाव माहित नाही) फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन पॉलिसी सरेंडर करुन फिर्यादी यांच्या अक्सिस बँकेच्या खात्यात पैसे डीपोझीट करतो, असे सांगून त्याच्या बँक खात्यामधून एकूण 2 लाख 97 हजार 999 रुपये परस्पर संमत्तीशिवाय काढून ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.