पैशाच्या व्यवहारातून एकावर सुरीने वार

खेड:- उसने पैसे देण्यास नकार दिल्याने सुरीने वार केल्याप्रकरणी अमोल तांबडे (रा. खेड) याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ४ ऑक्टोबर रोजी रात्री खेड येथे घडला. या घटनेची तक्रार अजय विठोबा चव्हाण (वय ४१, रा. खेड) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.

अमोल तांबडे याने चव्हाण यांच्याकडे एक हजार रुपये उसने मागितले. परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे अमोल तांबडे याने अजय चव्हाण यांच्या उजव्या बाजुच्या हनुवटीच्या खालील बाजूस (गळ्यावर) तीन ते चार वार केले.