रत्नागिरी:- घुडेवठार ते जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मारहाण व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच व इतर सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
हर्षद पापय धुळप, अभिषेक पांचाळ, सुमित शिवलकर, आशिष सावंत, अमेय मसुरकर व इतर सहाजण असे संशयित आहेत. ही घटना रविवारी (ता. १८) रात्री अकरा ते पावणे बाराच्या सुमारास घुडेवठार ते जिल्हा रुग्णालय येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित व अन्य पाच ते सहा जणांनी घुडेवठार ते जिल्हा रुग्णालय येथे फिर्यादी यांचे भावजी अमोघ विलास पालकर यास मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.