Friday, October 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,  आजपासून नवे दर लागू

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,  आजपासून नवे दर लागू

रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार रत्नागिरीत पेट्रोलच्या दर 109.53 रुपये आणि डिझेल 96.6 रुपयांवर पोहचले आहेत. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत.