Friday, May 1, 2026
spot_img
Home संगमेश्वर पेट्रोलने चूल पेटवणे बेतले जीवावर; महिला ७० टक्के भाजली

पेट्रोलने चूल पेटवणे बेतले जीवावर; महिला ७० टक्के भाजली

चाफवली संगमेश्वर येथील घटना

रत्नागिरी:- चाफवली (ता. संगमेश्वर) येथे जंगलतोडीवर काम करणारी महिला पेट्रोलने चूल पेटवत असताना ७० टक्के भाजली. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. द्रौपदी चंद्रकांत पवार (वय ४२, रा. चाफवली, ता. संगमेश्वर) असे ७० टक्के भाजलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २८ डिसेंबरला दुपारी तीन च्या सुमारास चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार द्रौपदी हि चाफवली येथील जंगलमय भागात झोपडीत रहात असून रविवारी (ता.२८) दुपारी पेट्रोलने चूल पेटवत असताना आगीचा भडका उडाला व तिच्या कपड्यांनी पेट घेतला. या आगीचा भडका एवढा भयंकर होता की, त्यामध्ये ती ७० टक्के भाजली. तात्काळ उपचारासाठी साखरपा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.