रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणास लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ही घटना सोमवारी रात्री ११.३० वा . सुमारास घडली. राहुल राजन बेहेरे ( २३ रा. एमआयडीसी रत्नागिरी ) आणि रोहन सुभाष फोन्डेकर ( २८ रा. गयाळवाडी , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . त्यांच्याविरोधात गौष लालसाहेब सय्यद ( २७, रा.मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार , संशयित आणि त्यांच्यात यापूर्वी काही वाद झालेले होते. त्याचा राग मनात धरून सोमवारी रात्री त्या दोघांनी गौष यांच्या घरात घुसून त्यांना लोखंडी पाईपने हातांवर आणि पायांवर मारून गंभीर जखमी केले. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद भितळे करत आहेत.