पूर्णगड येथे जमीन वादातून दोन कुटुंबात जोरदार राडा;
 2 जखमी, 10 जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील मेर्वी खरडेवाडीत जमिनीच्या वादातून दोन कुुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यात 2 जण जखमी झाले असून 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्दी विनायक खरडे (38, मेर्वी खरडेवाडी, ता. रत्नागिरी) व त्यांचे पती विनायक खरडे हे दोघ किचनमध्ये चुलीजवळ बसलेले होते. याचवेळी त्यांच्या ओटीवर येऊन भरत खरडे याने मोठमोठयाने शिवीगाळ करत तू बाहेर पड तुला संपवतो अशाप्रकारे आरडा ओरडा करत होता. त्याचा आवाज ऐकून सिध्दी व विनायक बाहेर आले. त्यांच्यापाठोपाठ सिध्दी यांचे दीर सुरेश खरडे हेही बाहेर आले. बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता त्याच्यासोबत अन्य 9 जण हातात दांडके घेऊन घरात घुसले होते. त्यांना पाहताच सिध्दी व विनायक घाबरुन घरात पळून जात होते. यावेळी एकाने विनायक यांना धरून खाली पाडले आणि त्यांच्या पोटावर बसून घट्ट धरुन ठेवले व पायावर, पाठीवर जोरजोरात मारहाण केली. त्याचवेळी अन्य 5 जणांनी मिळून हाताने व लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असताना विनायक मोठमोठयाने ओरड होते. यावेळी त्यांचे भाऊ भरत व वडील सुरेश खरडे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात वडिलांना जबर मार बसला. यावेळी भरत यांनी मोठयानेे बोंब ठोकली बाबा संपले. हे ऐकताच हे 10 जण हातातील दांडके टाकून पळून गेले. या मारहाणीत विनायक सुरेश खरडे व सुरेश शिवराम खरडे (मेर्वी, खरडेवाडी) हे दोघेही जखमी झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
 याबाबतची फिर्याद सिध्दी खरडे यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी जान्हवी हेमनाथ खरडे, संजय बाबजी खरडे, निरंजन संजय खरडे, ज्योती संजय खरडे, शैलेश अशोक खरडे, ईश्वरी शैलेश खरडे, अंकुश लक्ष्मण खरडे, आरती अंकुश खरडे, दिपाली दिलीप खरडे, दिलीप पांडुरंग खरडे (सर्व रा. मेर्वी खरडेवाडी) यांच्यावर भादवि कलम 143, 147, 148, 149, 452, 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.